मी आणि Origaमी
Thank you 'team Sakal NIE'.
Mandar Vaidya
6/10/20251 min read


मी पूर्वी आनंदी असायचो; आजकाल सदानंदी असतो.
ओरिगामी... हा पोरखेळ म्हणून आज पर्यंत ओळखला जात होता. आपल्यापैकी बऱ्याच जणांना याची ओळख 'लहान मुलांसाठी' अशीच होती. मी मात्र याची माहिती-महती भेटेल त्याला सांगत राहिलो. काहींना पटले, काहींना नाही.
माझ्या ओरिगामीची माहिती पुणे सकाळ चे मुख्य संपादक श्री. सम्राट फडणीस यांच्यापर्यंत पोहोचली. ध्यानी-मनी नसताना थोड्या वेळासाठी त्यांची भेट देखील झाली. "आपण हे छापूया, तू लिहायला सुरु कर" असा आश्वासक शब्द मिळाला. आणि माझी ओरिगामी नव्याने बहरली. सकाळ एनआयई या विशेषतः शालेय वयोगटासाठीच्या वर्तमानपत्रामध्ये आजपर्यंत २० छान कलाकृती प्रसिद्ध झाल्या आहेत. अजूनही होत आहेत.
वरील छायाचित्र, गुहागर इथे इयत्ता सातवी मध्ये शिकणाऱ्या गार्गीचे आहे. ती सकाळ एनआयई ची नियमित वाचक आहे. माझी ओरिगामी पाहून तिला खूप आनंद झाला. त्याबद्दल तिने आईला संगीतले. मला सर्वात पहिला फोन त्यांचाच आला.
गेल्या वर्षी २०२५ मध्ये आपण किमान १०,००० शालेय मुलामुलींपर्यंत ओरिगामी पोहोचवायची असा निश्चय केला होता. तो कधीच पूर्ण झालाय. सकाळच्या माध्यमातून माझी ओरिगामी महाराष्ट्रातील लाखभर जणांपर्यंत पोहोचली आहे. तुम्ही सुद्धा पहा. स्वनिर्मितीच्या आनंदामध्ये रममाण व्हा.
आज पर्यंत ओरिगामीसाठी मला अनेकांचे सहकार्य आणि त्यातून अनंत आनंदाचे क्षण लाभले. त्या सर्वाना स्मरून आनंदी पासून सदानंदी होण्याच्या माझ्या वाटचालीमध्ये सकाळ एनआयई चा वाटा अमूल्य आहे हे मी नम्रपणे सांगू इच्छितो.
- मी आणि Origaमी
Origami for peace
Explore the joy of origami for everyone.
Origami School
Join us
+91-9423859848
© 2025. All rights reserved.