आनंददायी ओरिगामी - नरकेज् पन्हाळा पब्लिक स्कुल येथे

आपल्या शाळेतील प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी ओरिगामी (२००० वर्षे जुनी जपानी कागद कला) अत्यंत आनंदाची आणि उत्साहाची ठरत आहे. गेल्या दोन महिन्यांत विद्यार्थी या कला प्रकाराचा सखोल आनंद घेत विविध ओरिगामी कलाकृती उत्तम प्रकारे तयार करायला शिकत आहेत. या सर्जनशील उपक्रमामुळे मुलांमध्ये कागद अचूकपणे कसा दुमडायचा (Fold), याविषयीची कौशल्ये विकसित होत आहेत.

प्रत्येक रविवारी आयोजित केल्या जाणाऱ्या ओरिगामी सत्रांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मुले केवळ कागद हाताळणे शिकतात असे नाही, तर शिस्तबद्ध पद्धतीने, शिकण्याच्या महत्त्वाच्या सवयी आत्मसात करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने:

लक्ष देऊन ऐकणे - शिक्षक काय सांगत आहेत, त्याकडे संपूर्ण लक्ष केंद्रित करणे.

समजून घेणे - सूचनांमधील तांत्रिक बाबी आणि टप्पे अचूकपणे समजून घेणे.

अंमलबजावणी करणे - मिळालेल्या मार्गदर्शक सूचनांची तंतोतंत कृती करून कलाकृती पूर्ण करणे.

या कौशल्यांमुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता, आकलनशक्ती आणि स्मरणशक्ती वाढण्यास मोठी मदत होईल यात शंका नाही. कागदाच्या साध्या तुकड्यापासून विविध सुंदर वस्तू तयार करताना विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास द्विगुणित होताना दिसत आहे. हा प्रवास त्यांच्या बौद्धिक आणि मानसिक विकासासाठी अत्यंत पायाभूत ठरत असून, मुले या सर्जनशील प्रवासाचा पुरेपूर आनंद घेत आहेत.

दिवाळी सुट्टीतील ओरिगामीचा अभ्यास

सर्वाना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आज पर्यंत शिकवलेल्या सर्व कलाकृती मुलांनी घरी स्वतः बनवायच्या आहेत. घरी आई-बाबा, आजी-आजोबा, काका-काकू, मामा-मामी, आपली भावंडे मित्र-मैत्रिणी यांना देखील शिकवायच्या आहेत.

कागदाची घडी मन लावून, काटेकोरपणे घालण्याचा प्रयत्न नक्की करूया, पण घडी खूप छान आलीच पाहिजे असा अट्टाहास नको. तुम्ही घडी घालण्याचा प्रयत्न करत आहात ही देखील समाधानाची बाब आहे.

आता आजचा घराचा अभ्यास पूर्ण करूया.

ओरिगामीच्या आकृत्यांची भाषा जगभर प्रचलित आहे. या भाषेला कोणत्याही मर्यादा अथवा बंधने नाहीत. सुट्टीमध्ये आपण ही भाषा प्रयत्नपूर्वक शिकणार आहोत.

खाली दिलेला ओरिगामीचा आकाशकंदील आकृत्यांच्या साहाय्याने बनवा. यासाठी जास्तीत जास्त १० मिनिटांचा कालावधी लागेल. चला... करूया सुरुवात.

सुट्टीमध्ये आकृत्यांच्या साहाय्याने आणखी ४ सोप्या ओरिगामी कलाकृती बनवण्यासाठीच्या लिंक्स उद्या पाठवत आहे.

कलाकृती तयार केल्यानंतर मला 9423859848 या मोबाईल नंबर वर व्हॉट्सअप पाठवा. कलाकृती सोबत तुमचे नाव आणि इयत्ता लिहून पाठवा. 

कलाकृती तयार केल्यानंतर मला 9423859848 या मोबाईल नंबर वर व्हॉट्सअप पाठवा. कलाकृती सोबत तुमचे नाव आणि इयत्ता लिहून पाठवा.

Origami for peace

The joy of Origami for everyone.

Origami School

Join us

© 2026. All rights reserved.